नवरात्र मध्ये सोन्याचे दर बदलले; दर कमी झाला का वाढला? पहा आजचा नवीन दर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price 29 September 2025 | सध्या महाराष्ट्र मध्ये सणसुदीचे दिवस सुरू झालेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण असलेला नवरात्र उत्सव या उत्सवामध्ये बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. पण यावर्षी सोन खरेदी करणे म्हणजे खरंच डोंगर चढणे एवढं झाल आहे. कारण, सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात तर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राज्यात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिक पूर्णपणे वाया गेले आहे. वाढती महागाई शेतकऱ्यांना आणखी खोलात घेऊन चालली आहे. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की, दहा ग्रॅम सोन्यासाठी लाखाच्या घरात जाऊन पैसे मोजावे लागत आहेत. Gold Price 29 September 2025

आज (29 सप्टेंबर) सकाळी कमोडिटी बाजार उघडताच सोन्याच्या दरात झपाट्याने उसळी पाहायला मिळाली. मुंबई सोन्याचा भाव एक लाख 14 हजार 730 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका पोहोचला, तर चेन्नईमध्ये हाच दर एक लाख 15 हजार 70 रुपयांच्या घरात गेला. दिल्ली, कोलकत्ता, बंगळुरू, अशा सर्व मेट्रो शहरांमध्ये सोन्याचा दर 1.14 लाखांच्या आसपास असताना आपल्याला पाहायला मिळाला. इतकच नव्हे तर चांदीने तर सर्वांचे गणितच बिघडून टाकलं. चांदीच्या किमतीत थेट ₹1,43,637 प्रति किलो या विक्रमी उंच अंकावर पोहोचला.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन घटलं, आधीच बाजारभाव महागाईने कंबर मोडलं, त्यात सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडल्याने सामान्य माणूस अक्षरश हात चोळत बसलाय. एकेकाळी लग्न कार्यक्रमात सोन्याचे दागिने घ्यायचं स्वप्न रंगवणाऱ्या कुटुंबांना आता ते पूर्ण करणं कठीण झालंय. नवरात्र सारख्या मोठ्या सणात सुद्धा लोकांच्या खरेदीवर मर्यादा आली आहे.

सराफ बाजारातील दुकानदार सांगतात की, लोक दागिने खरेदी करताना बजेट कमी करून हलक्या वाजण्याचे दागिने निवडत आहेत. काही लोकांनी तर फक्त प्रतीकात्मक सोन घेतलं, तर काही नेचर चांदीकडे वाढण्याचा निर्णय घेतला.

तज्ञ सांगतात की, जागतिक पातळीवर डॉलर निर्देशांक घसरला आहे आणि अमेरिकन फेडरल रिझर्व व्याजदर कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोने सुरक्षित गुंतवणुकीचा साधन म्हणून त्याची मागणी वाढली, आणि दर आकाशाला भिडले. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये स्टॉप गोल्ड ₹3,789 प्रति अंश या नव्या उंच्च्कावर पोचलाय.

भारतामध्ये सोने केवळ गुंतवणूक नाही तर परंपरा आहे. पण आज अशी परिस्थिती आहे की नवरात्राच्या बाजारात सोनं चांदी पाहणं सोपं, पण खरेदी करणे अवघड झालंय. ग्राहक फक्त दुकानात जाऊन बघून परत येत आहेत. अनेक कुटुंब सांगतात की यावर्षी सोन घेऊ शकणार नाही, मुलीच्या लग्नापर्यंत थांबावच लागेल.

दरम्यान, गुंतवणूकदार मात्र याला सोन्यासारखी संधी म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करत आहेत. चांदीच्या वाढत्या किमतीमुळे इलेक्ट्रॉनिक्स, फोटोग्राफी आणि मेडिकल क्षेत्रातील उत्पादनावरही परिणाम होतोय. नवरात्र उत्सव देवीच्या चरणी सोन्याच्या दागिने अर्पण करण्याची इच्छा असतेच, पण यंदा मात्र सामान्य भक्तांसाठी ते स्वप्न ठरतंय. भाव इतके वाढलेत की, सोना खरेदी लोकांच्या हाताबाहेर गेली आहे. पुढील काही महिने हे चित्र कायम राहणार असल्याचे संकेत तज्ञांनी व्यक्त केले आहेत.

हे पण वाचा | सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण, नवीन सोन्याचे दर पहा

Leave a Comment

error: Content is protected !!