Farmer loan waiver : निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यातून विविध आश्वासन दिले होते. परंतु आता हे आश्वासन कधी पूर्ण करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. मारुती सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मोठी आश्वासन दिले होते. मात्र, सरकार स्थापन होऊन काही महिन्यांचा काळ उलटला असला तरी, सरकारने अद्याप कर्जमाफीचा निर्णय घेतलेला नाही. या पार्श्वभूमी वरती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड येथे कर्जमाफी बाबत महत्त्वाचे विधान केलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचा सूर पहिला मिळत आहे. Farmer loan waiver
उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?
- उपमुख्यमंत्री अजित पवार दौंड येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, “माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकली का? अंथरून पाहून हात पाय पसरायचे असतात” त्यांच्या या वक्तव्यामुळे कर्जमाफीच्या आश्वासनाबाबत संभ्रम वाढलेला असून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.
सरकारवर विरोधकांची टीका
- माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करू, व शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी योजनेतून वार्षिक ₹15,000 तसेच पिकांना हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पत्तेत आल्यानंतर या आश्वासनावर सध्या कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी यावर प्रतिक्रिया देत, “कर्जमाफी हे निवडणुकीचे फक्त एक आश्वासन होतं” असं म्हटलं आहे.
शेतकऱ्यांमध्ये वाढती नाराजी
माहिती सरकारने दिलेल्या आश्वासन अद्यापूर्ण केल्या नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढू लागलेली सरकारने यावर त्वरित निर्णय घेतला नाही तर शेतकरी वर्गाचा रोष आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महायुती सरकारचा पुढील निर्णय महत्त्वाचा
महायुती सरकारने कर्जमाफी संदर्भात पुढील भूमिका आणि यावरील कमी केलेले पिकाला सरकारकडून दिले जाणारे उत्तरेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.