केंद्र सरकारकडून मोठा निर्णय! 1 जानेवारीपासून ‘या’ लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द, तुमचे नाव तर नाही ना?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Central Government Ration Card News : रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील मोफत रेशन कार्डचा लाभ घेत असाल तरी ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा. केंद्र सरकार अंतर्गत काही महत्त्वाचे पाऊल या योजनेमध्ये उचलण्यात आलेले आहेत. या योजनेमध्ये अनेक नागरिक अपात्र असून देखील या योजनेचा लाभ घेत आहे अशा वरती कठोर कारवाई करण्यात येणार आहे. Central Government Ration Card News

भारत सरकार अंतर्गत गरीब कुटुंबांना आर्थिक आणि अन्नधान्य स्वस्त दरामध्ये मिळावं यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. रेशन कार्ड अंतर्गत नागरिकांना स्वस्त धान्य दिले जाते. तसेच, कोरोनाच्या काळापासून सर्व रेशन कार्डधारकांना मोफत राशन देण्यात येत आहे.

केंद्र सरकार गरीब आणि मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून अनेक लोक कल्याणकारी योजना राबवत असते, त्याचाही अनेक भारतीयांना लाभ होत आहे. असं असलं तरी दिसत अजूनही अशी परिस्थिती आहे की, अनेकदा दोन वेळेचं जेवण देखील काहींना मिळत नाही. अशा लोकांसाठी केंद्र सरकारने रेशन कार्ड ची सुविधा आणली आहे.

यामुळे देशभरातील जवळपास 80 कोटी लोकांना याचा फायदा होत आहे. परंतु याचा गैरफायदा देखील अनेक काही नागरिक घेत आहे. त्याचबरोबर या योजनेचा गैरफायदा रोखण्यासाठी काही लोकांवरती कठोर निर्णय करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पात्रते शिवाय, रेशन कार्ड घेणाऱ्यांची शिधापत्रिका रद्द करण्यात निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे.

बनावट शिधापत्रिकांवर कारवाई :

  • मध्यंतरी सरकारच्या नजरेत असे काही आले आहे की , मोफत रेशन या योजनेमध्ये गैरप्रकार झाल्याचा समोर आलेला आहे त्यासाठी एक जानेवारीपासून बनावट शिधापत्रिकांवर कारवाई करण्यात येणार असून, पात्रता शिवाय रेशन घेणारी ची ओळख E-KYC आणि इतर पद्धतीने केली जाणार आहे.

E- KYC प्रक्रिया अनिवार्य:

  • शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड मध्ये होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यासाठी शिधापत्रिका धारकांना E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. सुरुवातीला 31 डिसेंबर यांची मुदत होती जे आता फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. जर तुम्ही ई केवायसी प्रक्रिया केली नाही तर तुमचे रेशन कार्ड रद्द होण्याचा धोका आहे.

केवायसी प्रक्रिया पूर्ण कशी करावी?

  • तुम्ही अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन POS मशीनवर फिंगरप्रिंट पडताळणी करावी लागणार आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी आधार कार्ड व नोंदणीकृत मोबाईल क्रमांक सहा प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

E-KYC स्थिती तपासा

  • तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का नाही चेक करण्यासाठी “मेरा राशन.2.0” ही एप्लीकेशन डाउनलोड करा तिथे आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरची गरज पडेल.

Leave a Comment