Budget 2024: निवडणुकीपूर्वी मोदी सरकार अर्थसंकल्प मध्ये सर्वसामान्य मोठा दिलासा देऊ शकते. मोदी सरकारने देशातील नागरिकांसाठी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांची विमा कवच दिले होते. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला उपचारासाठी प्रत्येक वर्षी पाच लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच मिळते.
आता सरकार आरोग्य विमा संरक्षण 50% वाढू शकते. तशा सूचना सरकारला अर्थसंकल्पनात देण्यात आले आहेत. जर सरकारने या योजनेमध्ये 50 टक्क्यांनी वाढ केली तर हा विमा 7.50 लाख रुपये पर्यंत वाढेल असे वृत्त मनी कंट्रोल ने दिले आहे.
केंद्रातील मोदी सरकार एक फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या शेवटच्या अर्थसंकल्पनात सरकार ही घोषणा करू शकते. आयुष्मान भारत विमा वाढवण्याचा निर्णय अर्थसंकल्प 2024 मध्ये जाहीर करण्याची शक्यता आहे. तरीही अंतिम निर्णय घेणे बाकी आहे.
आयुष्मान भारत योजना काय आहे ?
आयुष्मान भारत योजना केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील लोकांना पाच लाख रुपये पर्यंत आरोग्य कवच विमा मिळतो. जन आरोग्य योजना किंवा PM-jAY हि जगातील सर्वात मोठा आरोग्य योजना पैकी एक आहे. ग्रामीण भागामध्ये PMJAY आरोग्य कवच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे कुटुंब आणि 16 ते 59 वर्ष वयोगटातील कुटुंबामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरते.
आयुष्यमान भारत योजनेसाठी असा करा अर्ज
- आयुष्मान भारत योजनेच्या अधिकृत mera.pmjay.gov.in वेबसाईटवर किंवा प्ले स्टोर वरून ॲप डाऊनलोड करून देखील तुम्ही या योजनेमध्ये नोंदणी करू शकता.
- आता स्क्रीनवर दिलेला मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका
- त्यानंतर ज्या राज्यातून या योजनेसाठी अर्ज करत आहात ते राज्य निवडा
- व त्यानंतर मोबाईल नंबर, नाव रेशन कार्ड नंबर किंवा आधार नंबर निवडा
- व त्यानंतर कौटुंबिक सदस्य टॅब वर क्लिक करून लाभार्थीची माहिती तपासा.
1 thought on “नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! 5 लाख नाही 7.50 लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच मिळणार, मोदी सरकार देणार मोठी भेट”