राज्य सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture Loan | महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रोत्सांवर अनुदान मिळणार आहे. या संबंधात मंत्रालयात बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून 2017,2018, व 2019 या तीन वर्षात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे.

यामध्ये सर्वात जास्त कर भरणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली आहे. या पात्र शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा जाहीर करण्यात आली होती परंतु हजारो शेतकरी या लाभांपासून वंचित होते.

या संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या कार्यालयावर आंदोलन केले होते. आंदोलन वेळी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ याविषयी सहकार मंत्री यांच्याबरोबर बैठक लावून निर्णय लावण्याचे आश्वासन दिले होते. अपात्र शेतकऱ्यांना पात्र करायचे झाल्यास शासन स्तरावर आदेश होणे गरजेचे असल्यामुळे सोमवारी आंदोलनाच्या शिष्टमंडळाने पुन्हा एकदा पालकमंत्री यांची जिल्हा बँकेत भेट घेतली.

यावेळी मंत्रालयात सहकार मंत्री यांनी वेळ दिले असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिली. बैठकीसाठी गुरुवारी मुंबईत त्यांना सांगितले आहे बैठकीमध्ये तोडगा न निघाल्यावर 26 जानेवारी रोजी पालकमंत्री यांच्या कागल मधील घरासमोर आंदोलन केले जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी असा इशारा दिला आहे.

Leave a Comment