Agriculture Loan: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. गेलेले महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा मोठा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या वेडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंत ची सर्व कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. विशेष म्हणजे त्याकालीन वित्तमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेची व्याप्ती वाढवली आणि ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे त्यांना या योजनेअंतर्गत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.
महाविकास आघाडीने घेतलेल्या या निर्णयाची मात्र गेल्या सरकारला अंमलबजावणी करता आली नाही. वर्तमान सरकारने मात्र गेल्या सरकारचा निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे. प्रोत्साहन योजनेअंतर्गत 2017, 2018, 2019 यापैकी किमान दोन वर्षाची नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
Agriculture Loan
यासाठी पहिल्या टप्प्यात व दुसऱ्या टप्प्यात हजारो शेतकऱ्यांची नावे आले आहेत. या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळाला आहे. मात्र या योजनेचा तिसरा टप्पा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही. यामुळे नियमित पीक कर्ज भरलेल्या अनेक शेतकरी यापासून वंचित असल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नियमित पीक कर्जाची परतफेड करणारे हजारो शेतकऱ्यांना या प्रोत्साहन अनुदान योजनेचा लाभ मिळाला नाही.
यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात याबाबत मोठे आंदोलन करण्यात आले आहे. नियमित पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची रक्कम मिळाली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे. नुकताच काही दिवसांपूर्वी याच मागण्याच्या पार्श्वभूमीवर शिरोळ येथील आंदोलकाच्या वतीने जिल्हा बँक समोर आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मश्रीफ यांनी सहकार मंत्री यांच्या सोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढायचे आश्वासन दिले आहे. दरम्यान आता या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उद्या अर्थातच 18 जानेवारीला महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्या याबाबत मंत्रालयात बैठक बोलवण्यात आली असल्याची माहिती आंदोलनाचे प्रमुख धनाजी चिंडूंगे यांनी प्रतिष्ठित पत्रकाराला दिले आहे. यामुळे आता या बैठकीत प्रोत्साहन अनुदान बाबत काय निर्णय घेतला यावर सर्व शेतकऱ्यांची लक्ष आहे.
हे पण वाचा:-
सरकारची नवीन योजना, नवीन जमीन खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज आणि 50 टक्के अनुदान पहा सविस्तर माहिती